पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त, लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार? अजित पवार यांचा पुनरुच्चार

पुणे, २८ मे २०२३ : मागील काही दिवसापूर्वी भाजपचे नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या जागेवर दावा केलाय तर काँग्रेसनेही पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केलाय.

यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर आज घडीला महानगरपालिकेमध्ये आमचे सदस्य जास्त आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिले पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत. काँग्रेसकडे याआधीपासूनच पुण्यातील जागा होती. पण अनेक वर्षांपासून काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही. असेही अजित पवार म्हणालेत. या जागेबाबत आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटले तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याचा पुनरूच्चार अजित पवार यांनी केला.

काल अजित पवार यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला होता.यावर काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही जागा परंपरागत काँग्रेसची आहे आणि ती काँग्रेसच लढवणार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. आता या जागेबाबत काय होणार हे पहावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा