राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, ११ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असे हा तरूण सांगत होता.भुजबळांना मारण्याची सुपारी आपल्याला मिळाली आहे. त्यांना मी उद्याच मारणार आहे, असेही या तरूणाने सांगितले. त्यानंतर तपासाला वेग आला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात पुण्यातील एका तरूणाने ही धमकी दिल्याचे समोर आले. त्या तरूणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. तसेच दोषी आढळल्यानंतर त्याला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान धमकी आल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृहात भुजबळ सध्या मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आज भुजबळ पुण्याहून निघणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा