राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंची महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसीची भूमिका,माध्यामातून होते सडकून टीका……

मुंबई;२१ जानेवारी २०२२;राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसीची भूमिका केल्यामुळे त्यांच्यावर अनेक माध्यमातून सडकून टीका होतेय. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी ही आपली भूमिका व्यक्त केलीय.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं जातंय तसेच वैचारिक आस्थेवर प्रश्नचिन्ह झाल्याची टीकाही होतेय.

अमोल कोल्हेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेला नुकसान होतंय का याचा विचार राष्ट्रवादीला करायचा आहे. यावर काय पावलं उचलायची याचा अधिकार राष्ट्रवादी पक्षाला आहे. मात्र, अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आस्थेवर आपण काही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला हे चुकीचं वाटत असेल तर त्यांनी जरूर कारवाई करावी.असे तुषार गांधीनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर म्हणाले…..

पुढे तुषार गांधी म्हणाले, “अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ती अभिनेता म्हणून केलीय. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. मी तर असं म्हणेन की त्यांना नथुराम आवडत असेल, त्यांचा आदर्श असेल तर तेही त्यांना स्वातंत्र्य आहे. जसं मला बापूंना मानायचं, भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, एका खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा. तो आमचा अधिकार आहे.”

“अमोल कोल्हे असं सांगत आहेत की त्यांनी ही नथुरामाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याआधी केली होती. चित्रीकरण झालं तेव्हा ते खासदार नव्हते. असं असेल तर मग त्यांनी आता चित्रपट होतोय तेव्हा त्यांनी त्याची प्रसिद्धी करायला नको. तसेच चित्रपटात जे दाखवलं जातंय त्याचा निषेध करत त्याला माझी मान्यता नाही हे स्पष्ट करायला हवं,” अशी मागणी तुषार गांधी यांनी केली.

तुषार गांधीनी हि सर्व प्रतिक्रिया एका वृतवाहिनीशी बोलताना दिली आहे.अमोल कोल्हेंच्या या भूमिकेमुळे समाज माध्यमे तशीच अनेक राजकीय स्तरावर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.त्यावर आता हे प्रकरण किती चिघेळल कि राजकीय रिंगणात नवीन वळण घेऊन येईल हे पाहणं रंजक ठरणार आहे…

न्यूज अनकट प्रतिनिधी ; निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा