पुणे, ८ डिसेंबर २०२०: शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पुण्यात पर्वती मतदार संघामध्ये बिबवेवाडी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, शिवदर्शन, पर्वती दर्शन, मित्र मंडळ, सारस बाग, टिळक रोड, अलका टॉकीज चौकापर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीकडून पाठिंब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली.
अलका टॉकीज चौकात होणाऱ्या निदर्शन सभेमध्ये आज पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील झाले. याप्रसंगी “शेतकरी विरोधी कायदा रद्द करा.. रद्द करा..” तसेच जय जवान जय किसान व “हल्लाबोल हल्लाबोल” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
देशभरातील शेकडो संघटना आणि २२ पक्षांचा बंदला पाठिंबा असताना पर्वती मतदार संघात सुद्धा या दुचाकी रॅलीमुळं जनजागृती होऊन उस्फूर्ततपणे बंद पाळण्यात आल्याचं दिसून आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे