वाल्हेत गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीकडून निषेध

पुरंदर, दि. २५ जून २०२० : महाराष्ट्राहसह देशातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टिका करणाऱ्या गोपीनाथ पडळकरची लायकी, संस्कृती, संस्कार व बुद्धीचे प्रतिबिंब त्याच्या विचारात दिसून येत आहे. हिमालयाची उंची असलेल्या साहेबांसारख्या माणसावर पडळकर सारख्या खुज्या टेकड्यांनी टिका केल्याने टेकडीची उंची कधीही मोठी होत नाही, असा घणाघाती हल्ला पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर चढविला.

जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल पंढरपुर येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द उच्चारल्याबद्दल आज वाल्हे (ता.पुरंदर) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करत पडळकर यांनी केलेल्या बेताल वकत्व्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. याप्रसंगी प्रा.दुगंबर दुर्गाडे सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रा.संतोष नवले, गोरख कदम, अशोक बरकडे, अभिषेक दुर्गाडे, संदेश पवार, संतोष दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, दादा मदने आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना दूर्गाडे म्हणाले कि, आपल्या वयापेक्षा दुप्पट ज्यांची राजकिय कारकिर्द आहे. अशा पवार साहेबांबद्दल शिवराळ भाषेत बोलण्यापुर्वी पडळकराने त्यांच्या नेत्यांचा मोदी -शहांचा सल्ला घ्यायला हवा होता. यामधुन त्यांची लायकी सिद्ध केली असून बिरोबाची खोटी शपथ घेऊन समाज बांधवांना फसविणाऱ्या व सत्तेच्या तुकड्यामागे पळत अनेक पक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या या श्वानाचा पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेद करण्यात येत आहे. भविष्यात बारामती लोकसभा मतदार संघात व पुरंदर तालुक्यामध्ये ज्या-ज्या वेळी हा दिसेल त्यावेळी त्याचे तोंड काळे केले जाईल असा सज्जड इशाराही यावेळी प्रा.दुर्गाडे यांनी दिला. सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. दिपक कुमठेकर यांनी सुत्रसंचालन तर महादेव चव्हाण यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा