नाशिक २२ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अथक प्रयत्नांतून सुरू असलेल्या ३०० कोटी रुपयांच्या कालवा विस्तारीकरण व अस्तरी करणाच्या कामांच्या प्रगतीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी केली.
आज पूनेगाव ते दरसवाडी कालव्याच्या दिंडोरी तालुक्यातील १२ किमी अंतरावरील अडचणीची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रसंगी नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाच्या उपअभियंता घुगे, पाणी आंदोलक मोहन शेलार, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, सुनिल पैठणकर, भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनार,स्विय सहाय्यक अशोक गालफाडे, तालुकाध्यक्ष दिपक गायकवाडआदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे