राष्ट्रवादी कर्नाटकात ४० ते ४५ जागा लढवणार ; महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याची तयारी

मुंबई, १४ एप्रिल २०२३: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या ४० ते ४५ जागांवर निवडणूक लढण्याची रणनीती आखत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. आगामी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यभरातील एकूण २२४ जागांपैकी राष्ट्रवादी किमान ४० ते ४५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याचा पक्षाचा विचार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी १० मे ला मतदान असेल तर मतमोजणी १३ मे ला होईल असं सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर तो परत मिळविण्याचा प्रयत्न एनसीपीकडून सुरू आहे. गोवा, मेघालय आणि मणिपूरमध्ये निवडणुकांमध्ये खराब कामगिरी नंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला होता. एनसीपीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना ‘घड्याळ’ चिन्ह देण्याची विनंती केली होती. ती आयोगाने स्वीकारलंही होते. असं सांगण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा