गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा खिंडार

गोंदिया ८ जुलै २०२४ : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव कीरसान यांच्या उपस्थितीमध्ये काल कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय लांजेवार यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळेस पक्ष प्रवेश केला. त्या मुळे प्रफुल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात प्रफुल पटेल यांना मोठ्या धक्का बसला आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असुन सुध्दा मोठ्या प्रमाणावर काँग्रेस प्रवेश झाल्याने प्रफुल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच प्रमाणे येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू राहील असल्याचे यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले असून पुन्हा राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली असल्याचे पहावयास मिळत असून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू असल्याचे दिसून आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नविन दहिकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा