राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकत्यांना आव्हान “कोणीही मुंबईला येऊ नये”

मुंबई, २२ मे २०२३: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज ‘आयएलएफएस’ प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांना विनंती केली आहे की, माझे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीला ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. जयंत पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सध्या ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ईडी चौकशीविरोधात कार्यालयाबाहेर कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांना विनंती केली आहे.

ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून, राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीला ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. परंतु कोणीही मुंबईला येऊ नये अशी विनंती करतो असं जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा