राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची तब्येत अचानक अस्थिर…..

6

पुणे, दि. २० जुलै २०२०: राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची तब्येत अचानक अस्थिर झाल्यामुळे त्यांना पुण्याच्या रुबी हाॅल क्लिनिक मधे दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोरोनाची टेस्ट झाली असून त्यांचा रिपोर्ट हा नेगेटिव्ह आला आहे. त्यांंच्या वर एका खासगी रुग्णालयात गेले ८ दिवस उपचार होत होते पण त्या उपचारांने त्यांच्या प्रकृती मधे सुधारणा होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.

रुपाली चाणकर यांच्या अस्थिर प्रकृतीची बातमी कळताच त्यांच्या संपुर्ण समर्थकांबरोबर राजकीय वर्तुळातून त्यांना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा येत असून राष्ट्रवादीला रामराम केलेल्या भाजपच्या चित्रा वाघ यांनी मैत्रीपुर्ण ट्विट केले आहे.

माझी मैत्रिण व जुनी सहकारी रुपाली चाकणकर हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचं समजलं. लवकरात लवकर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिच परमेश्वराकडे प्रार्थना, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

मागील काही दिवसापुर्वी रुपाली चाकणकर यांचा जालना दौरा झाला होता आणि त्या परतल्या तेव्हा त्यांना थकवा जाणवू लागल्याने सिंहगड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते पण तेथे प्रकृती मधे फरक दिसला नाही ज्यामुळे त्यांना रुबी हाॅल क्लिनिक येथे हलविण्यात आले असून घाबरण्याचे व काळजीचे काही कारण नाही असे त्यांच्या कुंटुबियांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा