राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

कराड, १५ ऑगस्ट २०२०: राज्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच आता मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होत असताना पाहण्यास मिळत आहे. ठाकरे सरकार मधील नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बाळासाहेब उर्फ शामराव पांडूरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल शुक्रवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला. पाटील यांच्याकडे साताऱ्याच्या पालकमंत्रीपदाचीही धुरा आहे. बाळासाहेब पाटील हे १९९९ पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

याआधी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेले बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा