एनडीए कुणाची जहागिरदारी नाही : संजय राऊत

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत बराच काळ रस्सीखेच झाली. त्यात दोघांपैकी कुणीच मुखयमंत्रीपद सोडायला तयार नसल्याने त्यांच्यात काडीमोड ही झाला. अखेर त्यामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.या पार्श्व भूमीवर ‘एनडीए कुणाची जहागीरदारी नाही. शिवसेना ही एनडीएच्या संस्थापकांपैकी एक आहे’, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच ।समाचार घेतला.
एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. एनडीएमध्ये राहायचं की नाही, कुणी ठेवायचं की नाही हा निर्णय घेणारी यंत्रणा कुठली आहे? असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राऊत यांनी पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर कमबॅक केले आहे. अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊत शनिवारी ‘सामना’च्या कार्यालयात रुजू झाले. यावेळी त्यांनी एका मराठी वाहिनीशी बातचीत केली. महाराष्ट्राच्या मनातली गोड बातमी मिळणार आहे. नवीन राजकीय मेन्यू आहे. त्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आहे, पण बातमी मिळेल हे नक्की, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा