कोरोनाचा अंत जवळ, ऑक्सवर्डची लस यशस्वी….

इंग्लंड, दि. २१ जुलै २०२०: जगभरात कोरोना लसीवर काम सुरु असून विविध देशातील अनेक लस या मानवी चाचण्यांमधे देखील पोहचल्या आहेत आणि अशातच त्यांच्या निष्कर्षाची वाट हे संपूर्ण जग करत आहे.

पण, आज घडीला ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस ही सुरक्षित असून ती शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणू बरोबर लढा द्यायला तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. या लशीची चाचणी १,०७७ स्वंयसेवकांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली होती. लस देण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होत असून कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी देखील तयार होत असल्याचं सांगितले गेले.

जागतिक आरोग्य संघटनेने काय सांगितले ?

जागतिक आरोग्य संघटनेने देखील या लसीचे स्वागत करत वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. तसेच अजूनही काही गोष्टीचा अभ्यास हा बाकी अाहे. त्या बरोबरच लस ही विकसित झाली खरी पण, तिला संपूर्ण जगामधे पोहचविण्याची मोठ्या कामगिरीचे आव्हान अजून ही समोर आसल्याचे ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचे डाॅ माईक रायन यांनी चाचणीचे परिणाम चांगले आहेत पण अजून भरपूर वेळ आहे, असं म्हणाले.

भारताला या लसीचा फायदा

भारतातील सीरम इन्सट्युटने ऑक्सवर्डच्या एस्ट्रा झेनेका कंपनी बरोबर करार केला आहे. ज्यामधे १ अब्ज डोज हे पुण्यातील सीरम इन्सट्यूट मधे उत्पादन होणार आहे. तर हि लस भारतात १००० रु मधे मिळणार आसल्याचे सीरम इन्सट्युटचे सी ई ओ पुनावाला यांनी सांगितले आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. ही औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. ऑक्सफर्डची या लसीची चाचणी प्राण्यांवर यशस्वी झाली आणि आता मानवी चाचणीत देखील ही लस प्रगतीपथावर आहे.

कोरोनाचा अंत हा मानवी वैज्ञानिक दृष्टीकोनातून सध्या जवळ आल्याचे चित्र जरी दिसत असले तरी नागारिकांनी नियम ढाब्यावर बसवून वागणे हे जे सध्याच्या घडीचे शाहणपण आहे जे एकदम चुकीचे आहे. लस ही जरी सकारात्मक परिणाम देत असली तर अजून ही त्यावर संशोधनाचे कार्य हे चालू असून आणखी काही महिन्यांचा आवधी या लसीला परिपक्व बनून बाजारात यायला लागेल. ज्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करत अजूनही काही काम आपले आयुष्य असेच व्यथित करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा