पुणे, २५ जुलै २०२३ : TRAI कडून गुरूवार २० जुलै ला एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, ज्यामध्ये artificial intelligence (AI) चा वापर आणि विकास जबाबदारीने करण्याच्या सूचना दिल्या आहे. यासाठी १० पानी रिपोर्ट बनवण्यात आला असुन त्यात, विशिष्ट AI चा वापर हा जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे, प्रामुख्याने अशा गोष्टींमध्ये ज्यात मानवी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
TRAI – Telecom Regulatory Authority of India च्या प्रस्तावानुसार, Artificial Intelligence and Data Authority of India( AIDAI) ची स्थापना करण्याची गरज आहे. ही संस्था regulator आणि recommendatory body म्हणून दोन्ही स्वरूपात काम करेल. AI शी निगडीत डोमेन मध्ये ती अॅडव्हायझरी रोल निभावेल. Ministry of Electronics and Information Technology ने AI ची administrative ministry देखील निर्माण करावी, असा प्रस्ताव दिला आहे.
दूरसंचार क्षेत्रात खाजगी सेवा प्रदात्यांच्या प्रवेशामुळे स्वतंत्र नियमनाची अत्यावश्यक गरज निर्माण झालीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ची स्थापना २० फेब्रुवारी १९९७ रोजी संसदेच्या एका अधिनियमाद्वारे करण्यात आली, ज्याला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा १९९७ म्हणतात, दूरसंचार सेवांचे नियमन करण्यासाठी टेरिफ निश्चित करणे/सुधारणा करणे यासह दूरसंचार सेवांचे नियमन करणे, हे TRAI चे काम आहे.
AI ची भूमिका ही टेलिकॉम सेक्टर पुरती मर्यादित नसून त्याचा प्रभाव आरोग्य, ट्रान्सपोर्टटेशन, वित्त, शिक्षण, कृषी क्षेत्रामध्येही पडू शकतो. त्यामुळे केवळ टेलिकॉम पुरते त्याला न पाहण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे.
टेलिकम्युनिकेशन विभागाकडून २०२० साली रेग्युलेटर बाबत विचारणा केली होती, परंतू TRAI ने तेव्हा AI technology ही विकसनशील असल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करण्यासाठी वेळ लागेल, असे सांगितले होते.
AIDAI ही भविष्यातील सर्व तंत्रज्ञान आणि AI मॉडेल्सवर, नाविन्यपूर्ण आर्किटेक्चर्सचा स्वीकार करण्यास सोपे पर्याय उपलब्ध करेल आणि सर्व AI मॉडल्स आणि विविध प्रयोगशाळांच्या मान्यता तसेच शिफारशींसाठी, दूरसंचार अभियांत्रिकी केंद्रासारख्या सरकारच्या तांत्रिक testing and accreditation संस्थांशी समन्वय साधेल. ही सर्वोच्च संस्था डाटा डिजिटलायझेशन, शेअरिंग आणि मॉनिटायझेशन याबाबत पॉलिसी बनवण्याचं आणि त्याच्या वापराबद्दल माहिती देण्याचं काम करणार आहे.
TRAI ने AIDAI ला AI governance आराखडा बनवण्याच्या सूचना केल्या आहे. यामध्ये प्रत्येक क्षेत्रासाठी आणि जनते साठी त्याचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो यासाठी तत्त्व देखील बनवली जातील. ग्राहकांची सुरक्षा करण्यासोबतच या सेक्टर मधील त्यांचा सहभाग वाढवला जावा यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे