सत्तेपुढे शहाणपण नाही मात्र आपल्यातील विश्वासघातकी कोण ओळखण्याची गरज – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण, २६ मार्च २०२३ : आपण उत्तर कोरेगाव मध्ये कॉरिडॉर व्हावा म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु कॉरिडोर अखेर माण तालुक्यामध्ये गेला असल्याचे समजते मात्र आपण हार मानायची नाही. कारण आपल्यातला खरा विश्वासघातकी कोण आहे हे ओळखण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटस वर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

श्रीमंत रामराजे पुढे म्हणतात की, आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण करणार असून यासाठी लवकरच मिटिंग बोलवणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

दिल्ली – मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर बँगलोर – मुंबई आर्थिक कॉरिडॉर तयार करण्याची योजना काढली आहे. कोणताही राजकीय वाद न घालता हा प्रकल्प झाला तर आमच्या जिल्ह्याचे कल्याण होईल. उत्तर कोरेगाव हे लोकेशन केंद्र सरकारला योग्य वाटत असेल तर कॉरिडॉर तिकडे करा. पण तितक्याच ताकदीचा कॉरिडॉर राज्यातून म्हसवडला करून द्या अशी मागणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती मा.आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्षवेधीमार्फत विधान परिषदेत केली होती.

माण तालुक्यातील कॉरिडॉरला आमचा बिलकुल विरोध नव्हता मात्र दोन्ही ठिकाणी कॉरिडॉर झाले असते तर सातारा जिल्ह्यांमध्ये मोठी औद्योगिक क्रांती झाली असती व जिल्ह्याच्या प्रगतीला मोठा हातभार लागला असता असेही श्रीमंत रामराजे यांचे म्हणणे होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा