नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

Akhil Bharatiya Natya Parishad awards
नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा जीवनगौरव

Akhil Bharatiya Natya Parishad awards 2025: दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो.या वर्षी या सोहळ्यात गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी,पुणे निर्मित गोविंदायन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसंच या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रध्दा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर यांचा सहभाग असणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचा वैशिष्ट्य म्हणजे रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत.यावर्षी या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री मा. श्रीमती नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते मा.श्री सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उद्योगमंत्री तथा अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.ना.श्री. उदय सामंत, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त मा.श्री. शशी प्रभू, अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मा.श्री.मोहन जोशी, मा.श्री.अशोक हांडे यांची उपस्थिती असणार आहे

सदर सोहळा हा नाटय परिषदेच्या सर्व सभासदांस आणि रसिकांना प्रवेश विनामूल्य असून काही जागा या राखीव ठेवण्यात येणार आहे.तसाच हा सोहळा ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी,इंदिरा तेंडोलकर