पुरंदर, दि. ४ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रहिवाशी असलेले डॉ. सौरभ मंदकनल्ली यांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा रुग्णसेवेसाठी तयार झाले आहेत. ते मुंबईतील हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करताना कोरोना बाधीत झाले होते.
येथील प्रसिद्ध डॉ. लिलाधर मंदकनल्ली व वैशाली मंदकनल्ली यांचे सुपुत्र डॉ. सौरभ लिलाधर मंदकनल्ली यांनी मुंबईमध्ये एम.एम.बी.एस.चे शिक्षण पुर्ण करून जुहू मधील कूपर हॉस्पिटल मध्ये इंटरशीप करीत आहे. यादरम्यान जगासह, देशात, राज्यात व मुंबई, पुणे सारख्या शहरात कोरोना संसर्गाचा वेगाने पसार झाला. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी वैद्यकिय यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले.
राज्यातील सर्वच वैद्यकिय यंत्रणेसह प्रशासन अलर्ट झाले. अशा प्रसंगात डॉ. सौरभ मंदकनल्ली यांनी ही मागे न राहता गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करीत आहेत.२३ जून रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने. ते उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान तरुण डॉक्टर असलेल्या डॉ. सौरभ मंदकनल्ली यांनी मोठ्या धैर्याने कोरोनाला हरवून त्यांंना २ जुलै रोजी हाँस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे.
यावर न थांबता डॉ. सौरभ पुन्हा जुहू मधील कूपर हॉस्पिटलमध्ये कोरोणाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. यातून त्यांनी राज्यातील डॉक्टरांंपुुढेे आदर्श निर्माण केला आहे. त्यामुुुुळे त्यांचे नीरा व परिसरात कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे