NeoCov: Omicron नंतर समोर आला नवीन धोकादायक कोरोनाव्हायरस, शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी

4

नवी दिल्ली, 29 जानेवारी 2022: चीनच्या वुहान शहरातील शास्त्रज्ञांनी नुकताच कोरोना व्हायरसबाबत इशारा दिलाय. शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, ‘NeoCov’ नावाच्या आणखी एका कोरोनाव्हायरसने जगात दस्तक दिली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा नवीन कोरोनाव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे आणि 3 पैकी 1 संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, हा नवीन कोरोनाव्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. रशियाची वृत्तसंस्था स्पुतनिकच्या मते, कोरोनाव्हायरसचा हा नवीन प्रकार खूपच जास्त संसर्गजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दरही खूप जास्त आहे.

तथापि, अहवालानुसार NeoCov विषाणू नवीन नाही. 2012 आणि 2015 मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याचा प्रादुर्भाव पहिल्यांदा आढळून आला. हा SARS-CoV-2 सारखाच आहे ज्यामुळं मानवांमध्ये कोरोनाव्हायरस संसर्ग होतो. दक्षिण आफ्रिकेत हा NeoCoV विषाणू वटवाघुळांच्या आत दिसला आहे आणि तो आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये दिसला आहे.

BioRxiv वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असं दिसून आलंय की NeoCoV आणि त्याचे प्रकार PDF-2180-CoV मानवांना संक्रमित करू शकतात. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांच्या मते, या नवीन कोरोनाव्हायरसला मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी फक्त एका उत्परिवर्तनाची आवश्यकता आहे. या नवीन विषाणूमुळं आणखी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असंही अभ्यासात म्हटलंय.

रशियाच्या विषाणूशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागाने निओकोव्हबद्दल जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की सध्या हा नवीन कोरोनाव्हायरस मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. सध्या हा नवीन विषाणू लोकांमध्ये पसरतो की नाही हा प्रश्न नसून त्याची क्षमता आणि धोका तपासण्याचा आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करत आहे, Omicron आणि त्याचा उप-प्रकार BA.2 भारतासह अनेक देशांमध्ये समोर येत आहेत. जगातील सुमारे 40 देशांमध्ये याची पुष्टी झालीय. UKHSA च्या मते, हा प्रकार Omicron पेक्षा खूप वेगाने पसरत आहे. डेन्मार्कमध्ये BA.2 ची अधिक प्रकरणं देखील नोंदवली गेली आहेत. डॅनिश संशोधकांनी चिंता व्यक्त केलीय की या नवीन प्रकारामुळं ओमिक्रॉन महामारीची दोन भिन्न स्पाईक येऊ शकतात. अशा परिस्थितीत आता ‘NeoCov’ ने लोकांची चिंता खूप वाढवलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा