नवी दिल्ली, दि. ३१ मे २०२०: भारत आणि नेपाळमधील वाद थांबलेला दिसत नाही. नवीन राजकीय नकाशाच्या संदर्भात नेपाळ सरकारने आपल्या संसदेत घटना दुरुस्ती विधेयक सादर केले. नेपाळचे कायदामंत्री शिवमय तुंबामंफे यांनी नवीन नकाशासंदर्भात संसदेत विधेयक मांडले आहे. नेपाळच्या या नवीन नकाशामध्ये भारतातील कलापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा यांचा देखील समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळशी भारताचे संबंध चर्चेत आले आहेत. नेपाळ हा भारताचा जुना मित्र असला तरी नेपाळचा नकाशा अद्ययावत करण्यासाठी घटना दुरुस्तीचे नेपाळी काँग्रेस समर्थन करत आहे. लिपुलेख, लिंपियाधुरा, आणि कालापाणी या वादग्रस्त भागाचा त्यांच्या प्रदेशात समावेश करायचा आहे. नेपाळचा नकाशा बदलण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
नेपाळने जेव्हा आपल्या अद्यावत नकाशा मध्ये भारतातील या तीन भागांचा समावेश केला तेव्हा भारताकडून नेपाळला तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली होती. त्यावेळेस परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळला सांगितले होते की नेपाळने भारताच्या प्रभुत्वतेचा आदर केला पाहिजे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते की आम्ही नेपाळ सरकारला असे कृत्रिम व्यंगचित्र प्रकाशित करण्यास टाळावे असे आवाहन केले आहे. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर करा असे ही सांगितले आहे.
वादाचे कारण काय?
नेपाळ सरकारच्या नव्या नकाशामध्ये कालापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधूराचा समावेश केल्याबद्दल भारताने आक्षेप घेतला आहे. नेपाळच्या या सुधारित नकाशाला भूमी संसाधन मंत्रालयाने नेपाळच्या कॅबिनेटच्या बैठकीत जाहीर केले आहे . हा नकाशा प्रसिद्ध झाला त्या वेळी उपस्थित मंत्रिमंडळ सदस्यांनी या नकाशावर मतदान केले. त्याच वेळी भारताने त्वरित आक्षेप घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी