गोल पोस्ट आरोग्य राज्यातील २४ तासात झालेली नवे कोरोना रुग्णवाढ….

राज्यातील २४ तासात झालेली नवे कोरोना रुग्णवाढ….

मुंबई, ४ ऑगस्ट २०२० : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासात नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त आहे.

गेल्या २४ तासात राज्यात ८,९६८ रुग्णांची भर पडली. तर २६६ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात १०,२२१ जणांना डिस्चार्ज मिळाला,सलग तिसऱ्या दिवशी घरी जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के एवढे झाले आहे.

४,५०,१९६ एवढी झाली आहे. राज्यात आजपर्यंत २,८७,०३० रुग्ण बरे झाले. राज्यात आज पर्यंत २२,९८,७२३ नमुन्यांपैकी ४,५०,१९६ नमुने पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे. राज्यात सध्या ९,४०,४८६ व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरणात आहेत तर ३७ हजार ९ जणांवर संस्थात्मक विलगीकरण यामध्ये उपचार घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version