२४ तासात राज्यात नवे कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम…

मुंबई, दि. २१ जुलै २०२०: महाराष्ट्रात आजही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला , तसेच रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट हा सुधारत आहे. यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोरोना रुग्ण वाढीचे नवनवे उच्चांक अजूनही महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. तर प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये ८२४० नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या आता ही ३,१८,६९५ एवढी झाला आहे. तर काल १७६ जण या कोरोनामुळे बळी पडले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण मृत्यूची संख्या १२०३० एवढी झाली आहे. राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ झाला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यंत १ लाख ७५ हजार २९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर काल दिवसभरात ५ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा