Zectron कंपनीची नवीन electric bike लाँच

पुणे, ६ नोव्हेंबर २०२२: कंपनीने नवीन बाईक लाँच केलीय. कंपनीने क्राउड फंडिंग कॅम्पेनमध्ये इंडीगोच्या माध्यमातून ही बाईक लॉन्च केलीय. यूएस क्षेत्रासाठी याचा सर्वाधिक वेग प्रतितास ३२ किमी आहे. तर युरोपमध्ये ती २५ किमी प्रतितास या टॉप स्पीडसह लॉन्च करण्यात आलीय. Zectron कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जवर एक आठवडा चालते.

Zectron इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्यं

या इलेक्ट्रिक बाईकच्या यूएस वेरिएंटबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 350W मोटर देण्यात आलीय, जी ताशी ३२ किलोमीटरचा टॉप स्पीड देऊ शकते. तर युरोपमध्ये बाईकच्या आत 250W मोटर देण्यात आली आहे. ही बाईक २५ किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देऊ शकते. म्हणजेच बाईकला परिसरातील सरकारी नियमांनुसार टॉप स्पीड देण्यात आलाय. बाईकच्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर तिची रेंज २४१ किमी आहे. जी एका चार्जची रेंज आहे.

Zectron इलेक्ट्रिक बाइकची किंमत

या इलेक्ट्रिक बाईकची किंमत १९९९ डॉलर म्हणजे १,६३,००० रुपये आहे. पण जे ग्राहक विक्रीच्या सुरुवातीला खरेदी करणार आहेत, त्यांना ही बाईक फक्त ८९९ डॉलर म्हणजे ७३ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपनीचं म्हणणं आहे की ही बाइक मर्यादित युनिटमध्ये लॉन्च करण्यात आलीय. ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑर्डर केली जाऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा