पुणे स्टेशन-दादर मार्गावर नव्या इलेक्ट्रिक शिवनेरी धावायला सुरुवात

पुणे, १९ मे २०२३: एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक शिवनेरी बस पुणे दादर मार्गावर आज सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून धावायला सुरुवात झाली. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच दहा इलेक्ट्रिक शिवनेरी बस दाखल झाल्या आहेत. त्या आज पासून पुणे स्टेशन येथून दादर करीता धावण्यास सुरुवात झाली आहे. यात इलेक्ट्रिक शिवनेरी पुणे विभागास ५ तर मुंबई विभागास ५ ई-शिवनेरी बस मिळाल्याने देण्यात आल्या आहेत.

या १० ई-शिवनेरी बसद्वारे दिवसभरात १५ फेऱ्या पुणे स्टेशन येथून दादर करता सुटतील व दादर येथून पुणे स्टेशन करता १५ फेऱ्या सुटतील. या फेऱ्या औंध मार्गे व निगडी मार्गे दर तासाला उपलब्ध राहतील. तिचे दर वातानुकूलित शिवनेरी प्रमाणे असणार आहेत. पुणे स्टेशन येथील स्थानकात एसटीच्या अधिकाऱ्यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अमृत जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलतीच्या तिकीटाचा लाभ घेता येईल. प्रवाश्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा