ऑनलाइन गेमिंगसाठी सरकारचे नवीन नियम, सट्टेबाजीवर बंदी

पुणे, ७ एप्रिल २०२३: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियमांचा एक संच जारी केला, ज्यामध्ये सट्टेबाजी आणि जुगाराचा समावेश असलेल्या कोणत्याही गेमवर बंदी घालण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, केंद्राने त्या सर्व खेळावर बंदी घातली आहे ज्यामध्ये बेटिंग आणि जुगाराचा समावेश आहे. तसेच या गेमिंससंदर्भातील कोणत्याही जाहिराती प्रसारित न करण्याचा सल्ला त्यांनी माध्यमांना दीला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाइन गेमिंगचे नियम बदलले, IT नियम 2021 मध्ये काही सुधारणा केल्या.

आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, ऑनलाइन गेमिंगमध्ये बेटिंग आणि जुगार खेळण्यास परवानगी दिली जाणार नाही. सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन (SRO) या ऑनलाइन गेमची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नियमांची पूर्तता झाली तरच ऑनलाइन गेम सार्वजनिक व्यासपीठावर चालवण्यास परवानगी दिली जाईल. ऑनलाईन गेमवर बेट लावली जात असल्याचं SRO ला आढळल्यास, सरकार त्याला मान्यता देणार नाही.

चंद्रशेखर म्हणाले की, या सुधारणांचा उद्देश इंटरनेटला खुला, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उत्तरदायी बनवणे हा आहे. ते म्हणाले, “ऑनलाइन गेमिंग ही भारतासाठी आणि तरुण भारतीयांसाठी नक्कीच मोठी संधी आहे. आम्ही भारताच्या ऑनलाइन गेमिंग इकोसिस्टमचा विस्तार आणि या उद्योगात वाढ होताना पाहत आहोत. पण यामध्ये ऑनलाइन बेटिंग आणि जुगारावर बंदी घालण्यात आली आहे.”

न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा