घडला नवीन इतिहास, जेफ बेझोस यांची टीम अंतराळातून सुरक्षितपणे परतली

वेस्ट टेक्सास, २१ जुलै २०२१: अंतराळ प्रवासाचा एक नवीन इतिहास तयार केला गेला आहे. जेफ बेझोस यांची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिनचे रॉकेट न्यू शेपर्ड चार प्रवाशांसह अंतराळाच्या प्रवासासाठी रवाना झाले आहे. हे २० जुलै रोजी म्हणजेच वेस्ट टेक्सासमधील ब्लू ओरिजिन लॉन्च साइट वन वरुन संध्याकाळी ६.४५ वाजता सुरू करण्यात आले. कॅप्सूलने चार अंतराळवीरांना सुमारे चार मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा आनंद दिला. त्यानंतर रॉकेटने पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला. सायंकाळी ६.५२ वाजता टीम सुरक्षितपणे जमिनीवर आली. कॅप्सूल सोडल्यानंतर जेफ बेझोस यांनी व्हॅली फंकला जोरदार मिठी मारली. यानंतर जेफ म्हणाले की हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस होता.

कॅप्सूल बाहेर पडल्यानंतर, चार अंतराळवीरांचे त्यांच्या कुटुंबियांनी अभिनंदन केले. जेफ बेझोस आणि त्यांच्या टीमसमोर शॅम्पेनची बाटली उघडून आनंद साजरा केला. चार अंतराळवीर देखील या ठिकाणी खूप भावनिक दिसले. सर्वात आनंदी होती ८२ वर्षीय वॅली फंक. त्या जगातील सर्वात वयोवृद्ध अंतराळ वीर ठरल्या आहेत.

बिना पायलटचे कॅप्सूल

न्यू शेफर्ड कॅप्सूल कोणताही प्रवासी पायलटच्या भूमिकेत नव्हता. यासाठी, पृथ्वीवरच एक नियंत्रण कक्ष बनवले गेले. कॅप्सूल सहा प्रवाश्यांसाठी अनुकूल आहे, परंतु केवळ चौघांनी प्रवास केला. यात मोठ्या खिडक्या बसविण्यात आल्या आहेत जेणेकरुन प्रवाशांना अंतराळातून प्रक्षेपण आणि पृथ्वीचे अधिक चांगले दृष्य मिळेल.

ॲमेझॉन चे संस्थापक आणि अब्जाधीश जेफ बेझोस जेव्हा अंतराळयात्रेवर गेले होते, तेव्हा या उड्डाणाचे वास्तव साकारणाऱ्यांपैकी एक भारतीय कन्या संजल गावडे हीचे नाव देखील इतिहासात कोरले गेले आहे. महाराष्ट्रातील कल्याणमध्ये वाढलेल्या संजल गावडे हिने बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या सब-ऑर्बिटल रॉकेट ‘न्यू शेफर्ड’ विकसित करणार्‍या संघात मोलाची भूमिका बजावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा