कर्नाटकात आढळला नवा संसर्ग; प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शक तत्त्वे जारी

पुणे, ७ मार्च २०२३ : कर्नाटकमध्ये कोरोनानंतर नवा संसर्ग आढळला आहे. नव्या व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक राज्य आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावेळी कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी नागरिकांना उपायांचे पालन करण्यास सांगितले आहे; तसेच कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सोमवारी सांगितले की, राज्यात इन्फ्लूएंझा सब टाइप एच ३, एन २ व्हेरिएंट व्हायरसच्या संसर्गामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. कर्नाटकमध्ये सर्व रुग्णालयांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे, असे आदेशदेखील सरकारने जारी केले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत कर्नाटकमध्ये ‘एच १, एन १’ची २० प्रकरणे, ‘एच ३, एन ३’ची २६ प्रकरणे, ‘इन्फ्लूएंझा बी १०’ची १० प्रकरणे आढळली आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, लहान मुले व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी गर्दीच्या भागात जाणे टाळले पाहिजे. गर्भवती महिलांनीही प्रत्येक प्रोटोकॉलचे पालन करावे. वातावरणातही सातत्याने बदल होत आहे. तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा