जम्मू काश्मीर, ०६ ऑगस्ट २०२०: जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. काल मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.
बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ ऑगस्टला जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता व विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचे सांगण्यात येते. तसेच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकी सारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.
मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यामुळेच पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी:










































