पुणे, दि. १७ जून २०२०: बरेच वेळा असे होते की आपल्याकडून किंवा एखादा फोटो चुकून डिलीट होतो. बऱ्याच वेळा असे होते की आपण फोटो किंवा व्हिडिओ डिलीट करू परंतु नंतर कोणत्या तरी कारणासाठी आपल्याला ते हवे असतात आणि नंतर आपण त्या गोष्टीचा पस्तावा करतो की आपण फोटो डिलीट केला. पण आता आपल्याला हे टाळता येऊ शकते. आता आपल्याकडून फोटो डिलीट झाला तरी तो पुन्हा मिळवणे शक्य होणार आहे तसे फिचर अँड्रॉइड ने नवीन वर्जन मध्ये दिले आहे
गुगलने अँन्ड्रॉईड ११ सह रिसायकल बिन फिचर सर्व स्मार्टफोनमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सुविधा तुम्ही आपल्या डेस्कटॉप कॉम्प्युटर वर किंवा लॅपटॉप मध्ये पाहिली असेल पण आता हीच सुविधा तुमच्या मोबाईल मध्ये देखील उपलब्ध असणार आहे.
अँन्ड्रॉईड ११ च्या अपडेटसह जवळजवळ सर्वच अँन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हे फिचर्स युजर्सला देण्यात येणार आहे. या फिचर्सचा फायदा मात्र सध्याच्या लेटेस्ट अपडेटचे नोटिफिकेशन मिळणाऱ्या युजर्सलाच होणार आहे.
युजर्सला हे नवे फिचर मिळाल्यानंतर फोनमधील जे फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाले आहेत ते रिसायकल बिन येथून पुन्हा मिळवता येणार आहेत. मात्र हे फोटो किंवा व्हिडिओ फक्त ३० दिवसच राहणार असून त्यानंतर ते अपोआप डिलिट होणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी