नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : लँड रोव्हरने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन लक्झरी कार ‘रेंज रोव्हर वेलार’ फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत ९३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याबरोबरच कंपनीने या कारसाठी बुकिंगही सुरू केले आहे, ज्याची डिलिव्हरी सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू होईल
रेंज रोव्हर वेलार च्या एक्सटर्नल लूकबद्दल बोलायचे झाल्यास, रेंज रोव्हर वेलार फेसलिफ्टमध्ये सुधारित डीआरएलसह नवीन पिक्सेल एलईडी हेडलॅम्प सादर केले गेले आहेत. त्याची साइड प्रोफाइल पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे, तर मागील बाजू बदलण्यात आली आहे. ज्यामध्ये टेल लॅम्प आणि बंपर पुन्हा डिझाइन करण्यात आले आहेत.
नवीन रेंज रोव्हर वेलारच्या इंटिरियर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या डॅशबोर्डला रेंज रोव्हर वेलार स्पोर्ट आणि रेंज रोव्हर सारखे नवीन डॅशबोर्ड मिळाले आहे. ज्यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले ही Land Rover’s पिवी प्रो चालवणारी एकदम नवीन ११.४-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली यात आहे. तसेच वायरलेस चार्जर याचाही समावेश आहे. याशिवाय त्याच्या सेंटर कन्सोलमध्ये आणखी काही बटणे जोडण्यात आली आहेत. रोटरी ड्राइव्ह सिलेक्टरची जागा नवीन पारंपारिक युनिट्सने घेतली आहे.
कंपनीने ही नवीन लक्झरी कार एकच HSE प्रकार आणि दोन इंजिन पर्यायांसह लॉन्च केली आहे. म्हणजेच, नवीन वेलार 2.0l पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जे 250 hp कमाल पॉवर आणि 365 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याच वेळी, या SUV मध्ये सौम्य-हायब्रिड प्रणालीसह 2.0l डिझेल इंजिन देखील आहे, जे जास्तीत जास्त 204 hp आणि 430 NM पीक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत.
नवीन रेंज रोव्हर वेलरच्या पेट्रोल व्हेरियंटचा टॉप स्पीड २१७ किमी/तास आहे आणि ७.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. त्याच्या डिझेल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, याचा टॉप स्पीड २१० किमी/तास आहे आणि ते ८.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास करण्यास सक्षम आहे. त्याची वॉटर-वेडिंग क्षमता ५८० मिमी पर्यंत आहे. तसेच, ‘एलिगंट अरायव्हल’ मोडसह एअर सस्पेंशन आहे, जे त्याची उंची ४० मिमीने कमी करण्यास सक्षम आहे.
रेंज रोव्हर वेलारमध्ये ग्रेड डिझाइन, लक्झरी व तंत्रज्ञान यांचा समावेश असल्यामुळे ती सर्वात अस्पायरेशनल एसयूव्ही कार आहे. त्यातच नवीन डिझाइन, नवी टेक्नोलॉजी आणि सुसज्ज सुविधा यांच्यामुळे लोकप्रिय ठरत आहे, अशी माहिती जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे