Nashik Malegon Bombspot Updates : २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ मोटार सायकलवर झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी सध्या विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे.
न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत एक नवीन खुलासा उघड करण्यात आला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नागपूरहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला आणण्याचे आदेश दिले होते. असा दावा तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबुब मुजावर यांनी दावा केला. मात्र, परमबीर सिंह यांनी हा आदेश पाळला नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्याचा कट रचण्यात आला आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असा आरोप वकिलांनी मालेगांव सत्र न्यायाललयात केला आहे.
या नव्या दाव्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला वेगळे वळण आले असून, न्यायालयीन प्रक्रियेत याचा काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, नाना आहिरे