New Scorpio N Launch: बुकिंग, डिलिव्हरी 30 जुलैपासून

पुणे, 28 जून 2022: नवीन Scorpio-N ची बिग डॅडी बाजारात लॉन्च झाली आहे. महिंद्राने आपल्या नवीन स्कॉर्पिओमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स जोडले आहेत. पण ज्या फीचर्सची सर्वाधिक चर्चा होते ते म्हणजे सनरूफ. महिंद्राने प्रथमच स्कॉर्पिओच्या कोणत्याही व्हेरिएंट सनरूफ फीचर जोडलं आहे. कंपनी त्याला ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ म्हणून प्रमोट करत आहे. कंपनीने सांगितलं की, नवीन स्कॉर्पिओची किंमत लवकरच जाहीर केली जाईल.

कंपनीने लॉन्च प्रसंगी सांगितलं की, नवीन स्कॉर्पिओचं बुकिंग 30 जुलैपासून सुरू होईल. ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बुक करू शकतील. देशातील 30 प्रमुख शहरांमध्ये या SUV ची टेस्ट ड्रायव्हिंग 5 जुलैपासून सुरू होईल, तर इतर शहरांमध्ये ही SUV 15 जुलैपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असेल.

इंटीरियर बदल

महिंद्राने नवीन स्कॉर्पिओमध्ये सीटपासून इंटिरियरपर्यंत मोठा बदल केलाय. कमांड सीट्ससह नवीन स्कॉर्पिओ बाजारात आली आहे. या सीटवर बसण्याची जागा उंच असते. कोणत्याही एसयूव्हीमध्ये हे सीट एक खास फीचर आहे.

तसेच नवीन स्कॉर्पिओचा दरवाजा मागून उघडणार नाही. याशिवाय मागच्या सीटवर जाण्यासाठी मधली सीट फोल्ड करण्याची गरज भासणार नाही. नवीन स्कॉर्पिओमध्ये थर्ड लाइन सीटवर जाण्यासाठी कंपनीने वेगळी जागा दिली आहे.

मजबूत इंजिन

नवीन स्कॉर्पिओमध्ये 2.0-लीटर mStallion फोर-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन आहे. ही इंजिने XUV700 आणि Thar वर देखील आढळतात. याशिवाय, नवीन स्कॉर्पिओने 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसह बाजारात प्रवेश केला आहे. चेन्नईच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये हे तयार करण्यात आलं आहे. नवीन स्कॉर्पिओची डिझाईन महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे.

हे आहेत खास फीचर्स

महिंद्रा स्कॉर्पिओ एनचा इन्स्ट्रुमेंट कन्सोल पूर्णपणे डिजिटल असेल. तसेच टचस्क्रीन प्रणाली मोठ्या आकाराची आहे. 8-इंच टचस्क्रीन असलेली इन्फोटेनमेंट प्रणाली नवीन स्कॉर्पिओला आणखी शक्तिशाली बनवते. हे फीचर नवीन XUV700 मध्ये देखील वापरलं गेलं आहे.

नवीन स्कॉर्पिओमध्ये सोनीचे 12 स्पीकर साऊंड सिस्टमला अधिक पावरफूल बनवतील. याशिवाय, नवीन स्कॉर्पिओमध्ये 6 एअर बॅग उपलब्ध असतील, ज्यामुळं ही एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने खास बनते.

ऑटोमॅटिक ORVM, छतावरील साइड रेल आणि शार्क अँटेना यांसारखी वैशिष्ट्ये दिसतील. कारच्या मागील बाजूस, ब्रेक लाईट दरवाजावर वरच्या दिशेने ठेवला आहे आणि टेल लाइट देखील सी-आकारात आहे.

महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ SG Hector, Tata Safari, Hyundai Alcazar आणि Jeep Compass सोबत SUVs मार्केटमध्ये स्पर्धा करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा