पुणे, २ सप्टेंबर २०२१: शाओमीने यावर्षी एप्रिलमध्ये Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन लाँच केले. कंपनीने आता या स्मार्टफोनचे नवीन कलर व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. हा स्मार्टफोन विंटेज ब्रॉन्झ, ग्लेशियल ब्लू आणि डार्क नाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आधीच उपलब्ध आहे.
आता शाओमीने या स्मार्टफोनचा डार्क नेबुला कलर ऑप्शनही लॉन्च केला आहे. Redmi Note 10 proची सुरुवातीची किंमत १७,९९९ रुपये आहे. Redmi Note 10 Pro Maxची किंमत १९,९९९ रुपयांपासून सुरू होते. Mi.com वर नवीन कलर व्हेरिएंट उपलब्ध आहे.
हे लवकरच ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन आणि ऑफलाइन Home Storesवर उपलब्ध होईल. कंपनी Redmi Note 10 Pro वर १,५०० रुपयांची त्वरित सूट देखील देत आहे. कंपनी Redmi Note 10 Pro Maxवर २,५०० रुपयांची त्वरित सूट देत आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.६७-इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. संरक्षणासाठी, त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आली आहे. यासोबत 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हे डिव्हाइस अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI 12.5 वर चालते.
दोन्ही फोनमध्ये १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.
Redmi Note 10 Pro च्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Redmi Note 10 Pro Maxच्या मागील बाजूस १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे