भारतीय हवाई दलात नवी वेपन सिस्टिम ब्रांच, होणार ३४०० कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२२: भारतीय हवाई दलाला एक नवीन सर्वसमावेशक ऑपरेशनल ब्रांच मिळाली आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force Day) स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शनिवारी चंदीगढ येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिके, कसरती सादर करत भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यांचं दर्शन घडले.

दरम्यान यावेळी वायू दलासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी भारतीय हवाई दलाच्या नवीन कॉम्बॅट युनिफॉर्मचं अनावरण करण्यात आले. याशिवाय भारतीय हवाई दलासाठी नवीन सर्वसमावेशक अशी नवीन वेपन सिस्टम शाखा (New Branch for Weapon Systems) म्हणजे शस्त्र शाखेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार आता इंडियन एअर फोर्स वेपन सिस्टिम ब्रांच (Weapon System Branch) अर्थात भारतीय हवाई दलाच्या शस्त्र शाखेअंतर्गत सर्व शस्त्रांचं कामकाज पाहिले जाणार आहे.

हवाई दलातील शस्त्रांसाठी नवीन शाखा

यावेळी भारतीय हवाई दल प्रमुख वी.आर. चौधरी यांनी नवीन ऑपरेशनल शाखेची घोषणा केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने भारतीय हवाई दलात नवी वेपन सिस्टिम ब्रांच तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या नव्या शाखेअंतर्गत भारतीय हवाई दलातील (IAF) सर्व शस्त्र प्रणाली हाताळण्यात येईल. नव्या शाखेच्या निर्मितीमुळे सुमारे ३४०० कोटींची बचत होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हवाई दलासाठी अशी स्वतंत्र शस्त्र शाखा निर्मिती करण्यात येणार आहे. ही हवाई दलातील चौथी शाखा असेल.

३४०० कोटी रुपयांची बचत होणार

यावेळी अधिक माहिती देताना भारतीय हवाई दल प्रमुखांनी यावेळी सांगितले की, या शाखेमुळे भारतीय हवाई दल आणि लष्करात समन्वय साधण्यासाठीही मदत होईल. या शाखे अंतर्गत भारतीय वायू दलाच्या सर्व विभागातील सर्व प्रकारच्या शस्त्रांची देखभाल आणि कामकाज पाहण्यात येईल. यामुळे ३,४०० कोटी रुपयांहून अधिक निधीची बचत होणार आहे. नवीन वेपन सिस्टिम ब्रांच हवाई दलातील विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र आणि इतर हत्यारांवर नियंत्रण ठेवेल. या शाखेमुळे हवाई दलातील प्रशिक्षणाचा खर्चही कमी होईल.

हवाई दलाला मिळाला नवा कॉम्बॅट युनिफॉर्म

हवाई दलाला नवा गणवेश मिळाला आहे. भारतीय हवाई दलाचा नवीन गणवेश हा लष्कराच्या युनिफॉर्मसारखाच आहे. याची थीम ‘ट्रान्सफॉर्मिंग फॉर द फ्युचर’ अशी ठेवण्यात आली आहे. युनिफॉर्मचा डिजिटल पॅटर्न सर्व परिसरांसाठी अनुकूल आहे. यामुळे सैनिकांना वाळवंट, डोंगराळ भाग किंवा जंगल यांसारख्या कोणत्याही ठिकाणाहून वावरताना आराम मिळेल. हा गणवेश हवाई दलाची स्थायी ड्रेस कमिटी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) यांनी तयार केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा