नवीन वर्षात येणार ८ हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा!

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या प्रारंभीच राज्यातील ८ हजार शिक्षकांना नोकरी गमवावी लागेल.
राज्यामध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेने निश्चित केलेली टीईटी उत्तीर्णतेची पात्रता ३१ मार्चपर्यंत मिळवून देणे आवश्यक होते.

राज्य शासनाकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला टीईटी उत्तीर्ण होण्याबाबत अतिरिक्त संधी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार पात्रता नसलेल्या शिक्षकांना तूर्तास सेवेतून न काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ३ जून २०१९ च्या पत्राद्वारे फेटाळली.

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांवर २४ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार सेवा बंदच्या कारवाईचे आदेश २५ नोव्हेंबरला दिले होते. त्यानंतर महिनाभराने प्रत्यक्ष कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून दिले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा