सर्वात जास्त वायू प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत न्यूयॉर्क पहिल्या क्रमांकावर

न्यूयॉर्क, ८ जून २०२३: कॅनडाच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रदूषणाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जगातील सर्वात खराब हवेच्या यादीत न्यूयॉर्क पहिल्या क्रमांकावर पोहोचले. मंगळवारी रात्री न्यूयॉर्क शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (AQI) २०० हून अधिक नोंदवला गेला.

न्यूयॉर्कमधील प्रदूषणाचे कारण म्हणजे क्युबेकमधील शंभराहून अधिक जंगलांमध्ये लागलेली आग. या आगीमुळे दक्षिणेतून घातक धूर निघत आहे. गेल्या आठवडाभरापासून कॅनडामधील जंगलातील आगीच्या धुरामुळे ईशान्य आणि मध्य – अटलांटिकचा भाग प्रभावित झाला आहे. या कारणास्तव या भागांमधील हवेची गुणवत्ता सतत खालावत आहे.

IQair च्या मते, मंगळवारी रात्री न्यूयॉर्क शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स २०० च्या वर नोंदवला गेला. मंगळवारी रात्री 10 वाजता, न्यूयॉर्क शहराची हवा जगतील सर्व मोठ्या शहरांच्या हवेच्या तुलनेत वाईट होती. IQair ने अहवाल दिला की, न्यूयॉर्क शहरामध्ये नवी दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट पातळीच्या वायू प्रदूषणाची नोंद झाली आहे. याशिवाय दोहा, बगदाद, इराक आणि लाहोरचा खराब हवा आसलेल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी थोड्या काळासाठी, न्यूयॉर्क जगातील सर्वात खराब हवेच्या यादीत पहिले होते.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा