पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनचा इंग्लंडवर ८ गडी राखून पराभव, डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलची नाबाद शतके

पुणे, ९ सप्टेंबर २०२३ : द्विपक्षीय ४ सामन्यांच्या ODI मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला आणि १-० अशी आघाडी घेतली. हा सामना शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सोफिया गार्डन्स, कार्डिफ मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ६ गडी गमावून २९१ धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी ५० षटकांत २९२ धावांचे लक्ष्य दिले.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने ६८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्यांच्याशिवाय डेव्हिड मलानने ५४ धावा करत अर्धशतकं झळकावल, बेन स्टोक्सने ५२ धावा आणि लियाम लिव्हिंग्स्टनने ५२ धावांची अर्धशतकं झळकावली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने २६ चेंडू बाकी असताना ४५.४ षटकात केवळ २ गडी गमावून २९७ धावा केल्या आणि या मालिकेत विजयाचा झेंडा फडकावला. पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली.

न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने १२१ चेंडूंत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १११* धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. डॅरिल मिशेलने धमाकेदार फलंदाजी करताना संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. डॅरिलने ९१ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११८* धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडच्या डावाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाबाद १११* धावा केल्याबद्दल डेव्हॉन कॉनवेला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा