ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची बातमी

आगरा , ४ मार्च २०२१ : ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची बातमी कळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अफरातफरीचे वातावरण आहे. असे सांगितले जात आहे की कोणीतरी फोन करून ताजमहालमध्ये स्फोटक ठेवल्याची बातमी दिली होती. यानंतर सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे . संपूर्ण संकुलाचा शोध घेण्यात येत आहे. ताजमहालचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताजमहाल आणि आसपासच्या भागात मोठ्या संख्येने सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सध्या संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबविली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा