लंडन, २८ ऑक्टोबर २०२०: ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे परंतु कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत अशा लोकांसाठी आता एक वाईट बातमी समोर येत आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन आणि मार्केट रिसर्च फर्म इंपॉस मोरी यांनी असा दावा केला आहे की सिंटोमॅटिक/लक्षण असलेल्या रूग्णांपेक्षा नॉन-सिंटोमॅटिक रुग्ण वेगानं अँटीबॉडीज गमावतात. याचा अर्थ असा होतो की त्यांना कोरोनाची पुन्हा लागण होण्याचा धोका जास्त असतो.
मंगळवारी प्रकाशित झालेल्या या मोठ्या अभ्यासानुसार इम्पीरियल कॉलेज आणि इंपॉस मोरीच्या संशोधकांनी असाही दावा केला आहे की, ७५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये १८ ते २४ वयोगटातील युवकां पेक्षा ‘लॉस ऑफ अँटीबॉडीज’ ची गती तुलनेने कमी आहे. जूनच्या मध्यात ते सप्टेंबर अखेरपर्यंत इंग्लंडमध्ये जमा झालेल्या लाखो रुग्णांच्या उदाहरणावरून असं दिसून आलं आहे की, अँटीबॉडीज असलेल्या लोकांची संख्या सुमारे तीन महिन्यांत २६.५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
कनिष्ठ आरोग्यमंत्री जेम्स बेथेल म्हणाले की, हा संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आम्हाला कोविड -१९ ऑंटी बॉडीचं स्वरूप कालांतरानं समजून घेण्यास मदत करू शकेल. तथापि, शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला की, या विषाणूच्या प्रति दीर्घकालीन अँटीबॉडीज बाबतीत अनेक तथ्य अद्याप समोर आलेले नाहीत.
इम्पीरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या पॉल इलियट म्हणाले, “शरीरात अँटीबॉडीजचे स्तर काय राहील आणि प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे अद्याप स्पष्ट झालं नाही.” या अभ्यासामध्ये ३,६५,००० अनिश्चित पद्धतीनं निवडलेल्या वृद्धांचा समावेश केला गेला होता. या निवडलेल्या वृद्धांच्या घरी २० जून ते २८ सप्टेंबर दरम्यान कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसाठी तीन फेऱ्या फिंग प्रिक टेस्ट करण्यात आल्या होत्या.
या संशोधनात असं आढळून आलं की, तीन महिन्यांच्या कालावधीत अँटीबॉडीज असलेल्या लोकांची संख्या २६.५% घटली आहे. याचा अर्थ असा आहे की देशातील अँटीबॉडीज असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण ६.०% वरून ४.४% पर्यंत कमी झालं आहे. एक अग्रगण्य लेखक, हेलन वॉर्ड म्हणाले की, हा एक खूप मोठा अभ्यास आहे, ज्यामध्ये असं आढळून आलं की अँटीबॉडीज असलेल्या लोकांचं प्रमाण कमी होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे