पुढच्या महिन्यात बँका ८ दिवस बंद

नवी दिल्ली: जर तुम्हाला पुढच्या महिन्यात बँकिंग विषयी महत्त्वाची कामे असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्च २०२० मध्ये बँकिंग कामकाज सलग आठ दिवस खंडित होतील. म्हणूनच, जर तुम्हाला तुमची बँकिंग कामे वेळेवर पूर्ण करायची असतील तर तुम्हाला बँक हॉलिडेज आणि बँक स्ट्राइक लक्षात ठेवावं लागेल. बँकांमधील काम रखडल्यामुळे बँक शाखांमधील व्यवहार आणि चेक क्लिअरन्स यासारख्या ग्राहकांची महत्त्वाची बँकिंग कामे रोखली जाऊ शकतात.

बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) वेतनवाढीवरुन ११ ते १३ मार्च दरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. २०२० मध्ये बँक कर्मचारी संघटनांकडून आतापर्यंत तिसरा संप आहे. बँक संघटना वेतनात २० टक्के वाढ करण्याची मागणी करीत आहेत. युनियनने म्हटले आहे की आयबीएने नुकत्याच झालेल्या वाटाघाटींमध्ये १२.५ टक्क्यांनी वाढ करण्याची ऑफर दिली होती, परंतु ते मान्य नव्हते.

संपाची ही वेळही महत्त्वाची आहे कारण यापूर्वी १० मार्चला होळीची सुट्टी आहे आणि संपानंतर १४ मार्चला दुसरा शनिवार म्हणजे १५ मार्च रोजी रविवार असल्याने सुट्टी असेल. अशा प्रकारे, सहा दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुजरात उच्च न्यायालयात बँक व त्यांचे कर्मचारी यांच्यातील वादात हस्तक्षेप करू नका असे म्हटले आहे. या दोघांच्या वादात आरबीआयची कोणतीही भूमिका नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने मंगळवारी हे सांगितले. या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये आरबीआयला निर्देश देण्यात आले होते की, संघटनांच्या नेतृत्वात संप करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश बँकांना देण्यात यावे. या नंतर अर् बी आय ने उत्तर दिले.

जनहित याचिकेला उत्तर देताना आरबीआयने सरन्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती ए जे शास्त्री यांच्या खंडपीठाला सांगितले की बँका आणि त्यांच्या कर्मचार्‍यांमधील वादात आपली कोणतीही भूमिका नाही. तसेच केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की हा विषय कोणत्याही धोरणाशी संबंधित नाही, ज्यामध्ये अर् बी आय हस्तक्षेप करू शकेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा