NIA चा पुण्यातील PFI कार्यालयावर छापा

25

पुणे, २२ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, सह १० राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) अनेक ठिकाणावर छापे टाकले आहेत. तर पुण्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयावर NIA ने छापे टाकले आहेत. तर सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यातील सीआरपीएफ ची तुकडी दाखल करण्यात आली आहे, तसेच PFI च्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याच संदर्भात पुणे शहरासह देशातील अनेक शहरात केंद्रीय तपास यंत्रणा आज सकाळपासून छापेमारी करत आहे. तर केरळमधील (PFI) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिव ओमा सलाम यांच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले आहे. PFI संस्थेने टेरर फंडिंग संघटनेवर सुरू असलेली ट्रेनिंग संदर्भात सर्व विषय चौकशीसाठी पुण्यातील कोंढवा मध्ये PFI च्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले.

(PFI ) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया केरळ मध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना १९९३ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून झाली आहे, १९९२ मध्ये बाबरी मशिद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई (PFI स्टेट हेड ऑफिस पुरसवक्कम मध्येही झडती घेण्यात आली असून NIA, ED ने PFI चे अध्यक्ष ओमा सलाम यांच्या मलपुरम जिल्ह्यातील मंजेरी इथं मध्यरात्रीपासून छापे टाकण्यात आले आहे. NIA, ED, तसेच राज्य पोलिसांनी १० राज्यांमध्ये PFI च्या १०० हून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे