जम्मू-काश्मीर, २ मे २०२३: काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुंछ भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. लष्कराच्या वाहनाचे लोकेशन ट्रेस करून दहशतवाद्यांनी आधीच घात केला होता. गाडी येताच त्यांनी प्रचंड गोळीबार सुरू करून बॉम्बने हल्लाही केला. तेव्हापासून सुरक्षा आणि तपास यंत्रणा संपूर्ण काश्मीरमध्ये शोध मोहीम राबवत आहेत. आज एनआयए ४ जिल्ह्यांमध्ये अधिक ठिकाणी छापे टाकत आहेत.
पुंछमध्ये हल्ला झाला तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी धडक कारवाई सुरू केली. अशा परिस्थितीत अनेक नेत्यांनी एजन्सींवरच प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तपासाच्या नावाखाली लोकांचा नाहक छळ केला जात आहे. वर्षभरापूर्वी नोंदवलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी छापे टाकण्यात आल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. एनआयएने १२ ठिकाणी छापे टाकले आहेत.
अजूनही अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे साथीदार जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यात गुंतलेले आहेत. पुंछ हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. ज्यामध्ये त्याने हल्ला कसा केला हे सांगण्यात आले होते. आज एनआयएकडून मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये हे छापे टाकण्यात येत आहेत. खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये छापे टाकत आहेत. जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, हे प्रकरण टेरर लिंकशी संबंधित आहे, ज्याच्या संदर्भात गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्येही छापे टाकण्यात आले होते.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड