NIA ची बिहारमध्ये छापेमारी, दहशतवादी फंडिंग प्रकरणात एकाला अटक

6

बिहार २६ जून २०२३: राष्ट्रीय तपास संस्थेने आज सकाळी बिहारमधील मगध झोनमध्ये छापेमारी केली. सीपीआय दहशतवादी फंडिंग प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात आनंद पासवान नामक आरोपीला NIA कडून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी आरोपीवर बिहारमधील विविध पोलिस ठाण्यात पाचहून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली.

मगध प्रदेशात सीपीआय कॅडर आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्स द्वारे, संयुक्तपणे चालवल्या जात असलेल्या दहशतवादी वित्तपुरवठा नेटवर्क संबंधित प्रकरणातील ही चौथी अटक आहे. सीपीआय ही संघटना मगध झोन क्षेत्रात स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करतेय.

गुन्हेगारी आणि हिंसक योजना पुढे नेण्यासाठी, शस्त्रे आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी तसेच नवीन केडरची भरती करण्यासाठी, निधी गोळा करण्याचा प्रयत्न ते करत आहे, अशी माहिती NIA च्या तपासातून समोर आली.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा