जम्मू काश्मीर, १५ मे २०२३: दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने आज सकाळी जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि शोपियानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. पूंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. यानंतर दुसऱ्यांच आठवड्यात एनआयए ने ही मोठी कारवाई केली आहे.
रेझिस्टन्स फ्रंट, युनायटेड लिबरेशन फ्रंट जम्मू आणि काश्मीर, मुजाहिदीन गजवत-उल-हिंद, काश्मीर फ्रीडम फायटर्स, काश्मीर टायगर्स, अशा दहशतवादी संघटनांमध्ये सक्रीय असणाऱ्या दहशतवाधांनवर एनआयए ने छापेमारी केली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द केला. यानंतर हे दहशतवादी गट चर्चेत आले आहेत.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवली जात आहे. दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये शस्त्रे, बॉम्ब, ड्रग्ज इत्यादी पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. या प्रकरणी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या मदतीने केंद्रीय एजन्सीच्या गुप्तचरांनी काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला, शोपियान, कुलगाम, अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये तसेच पुंछ, राजौरी आणि किश्तवार जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर