Nigdi Workers’ Death Case: National Commission for Scheduled Castes Takes Strict Stand, Signals Action Against the Guilty!
निगडी येथे बीएसएनएलच्या चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आता कठोर भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतरही अद्याप केवळ ‘आकस्मिक मृत्यू’ अशी नोंद करण्यात आल्याने सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीची दखल घेत आयोगाने आता जिल्हा प्रशासन, बीएसएनएल आणि पोलिसांना तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात अद्याप कोणत्याही जबाबदार व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असले तरी, संबंधित बीएसएनएल अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संबंधित कामगारांना कामावर कोणी पाठवले होते आणि कामाचा ठेका कोणाकडे होता, याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
आयोगाने बजावलेल्या नोटीसमध्ये घटनेची सविस्तर माहिती, एफआयआरमधील तपशील, पीडितांची नावे आणि पत्ते, तसेच अटक केलेल्या व्यक्तींची माहिती आणि न्यायालयीन कार्यवाहीची सद्यस्थिती विचारली आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली असून, दोषींवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे











































.jpeg?updatedAt=1707979607248)
