नवी दिल्ली, २० ऑगस्ट २०२३ : भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV प्रेमींसाठी अनेक उत्तम पर्याय आहेत आणि Hyundai Venue ची प्रचंड क्रेझ आहे. Hyundai Motor India Limited ने आता स्पेशल नाईट एडिशन ऑफ द वेन्यू लाँच केले आहे. ज्यात ब्लॅक आउट ऍक्सेसरी एलिमेंट्स आणि युनिक ब्रास कलर इन्सर्टसह २३ विशेष वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने व्हेन्यू नाईट एडिशनला ऑल ब्लॅक इंटीरियर आणि ड्युअल कॅमेरा डॅशकॅम तसेच इलेक्ट्रो क्रोमिक इन रियर व्ह्यू मिरर दिले आहेत. ह्युंदाईने याआधी क्रेटाची नाईट एडिशनही लॉन्च केली होती.
या कारच्या कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार ४ मोनोटोन आणि १ ड्युअलटोन कलरमध्ये येते. ज्यामध्ये अॅबिस ब्लॅक, अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे, फायरी रेड आणि अॅबिस ब्लॅकचा समावेश आहे. Hyundai Venue Knight Edition च्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास व्हेन्यू नाईट एडिशन क्रेटा नाईट एडिशन प्रमाणेच आहे. या कारमध्ये ब्लॅक कलरची फ्रंट ग्रिल, ह्युंदाई लोगो, ब्रास कलरचा फ्रंट आणि रियर बंपर इन्सर्ट आहे.
Hyundai Venue Knight Edition या कारला पुढच्या चाकांवर ब्रास कलरचे इन्सर्ट, सेम कलरचा रूफ आणि डार्क क्रोम मागील Hyundai लोगो मिळतात. तसेच, तुम्हाला ब्लॅक कलरची हायलाईट रेल, शार्क-फिन अँटेना आणि लाल फ्रंट ब्रेक कॅलिपरसह ORVM मिळतात. ब्लॅक कलरची अलॉय व्हील/व्हील कव्हर्स, ब्लॅक फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, बॉडी कलर डोअर हँडल यांचा देखील समावेश आहे.
Hyundai Venue Knight Edition च्या इंटिरिअर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये ब्रास कलरच्या इन्सर्टसह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री आणि ब्रास कलर हायलाईट्स संपूर्ण ब्लॅक लूक पूर्ण करतात. वैशिष्ट्यांमध्ये आता ड्युअल कॅमेरे आणि मेटल पॅडलसह डॅशकॅम समाविष्ट आहे.
व्हेन्यूज नाईट एडिशन (Venue Knight) S(O) आणि SX व्हेरिएंटना मॅन्युअल ट्रान्समिशनसह १.२L पेट्रोल इंजिन मिळेल आणि SX(O) प्रकारात 6MT आणि 7DCT सह १.० L टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत १३.४ लाख रुपयांपर्यत आहे.
Hyundai नुकतेच Xeter लॉन्च केले आहे. लवकरच कंपनी नवीन कार आणण्यासाठी सज्ज आहे. एक्सेटरला काही सेगमेंट फर्स्ट फीचर्स मिळतात. यात सहा एअरबॅग्ज, सेल्फी पर्यायासह ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, व्हॉईस कंट्रोल्ड सनरूफ, कनेक्टेड सूटसह ८-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ४.२ -इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आहे.
Hyundai Venue च्या १.२ लिटर Kappa पेट्रोल इंजिन पर्यायातील S(O) Knight MT प्रकारची किंमत ९.९९.९९९ रुपये आहे. त्याच वेळी, एसएक्स नाइट एमटी व्हेरिएंटची किंमत ११,२५,७०० रुपये आहे आणि एसएक्स नाइट एमटी ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत ११,४०,७०० रुपये आहे. व्हेन्यू नाइट एडिशनच्या 1.0L T-GDi पेट्रोल इंजिनसह SX(O) Knight MT व्हेरियंटची किंमत १२,६५,१०० रुपये आहे. तर, SX(O) Knight MT ड्युअल टोन प्रकाराची किंमत रु. १२,८०,१०० आहे, SX(O) Knight DCT प्रकाराची किंमत रु. १३,३३,१०० आहे आणि SX(O) Knight DCT ड्युअल टोन प्रकारची किंमत रु. १३,४८,१०० आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे