गोल पोस्ट जिल्हा रत्नागिरी रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसांत नाईट लँडिंगची सुविधा

रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसांत नाईट लँडिंगची सुविधा

रत्नागिरी, २३ फेब्रुवारी २०२३ : रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसांत नाईट लँडिंगची सुविधा उभारली जाणार आहे. हे विमानतळ सुरू झाले की आपसूकच उद्योजक येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, की येथील विमानतळावर ८० सीटर विमान उतरविण्यासाठी पूरक धावपट्टी उभारण्यात आली आहे. उद्योजकांना हे सोयीचे ठरणार असून, भविष्यात त्याचा फायदा होईल. रात्रीच्या वेळी विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत. १०० मीटरची कंपाउंड वॉल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला असून, टर्मिनल इमारतीसाठीही २१ कोटी रुपये मिळालेले आहेत. यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मागील अडीच वर्षे ही प्रक्रिया रखडलेली होती. विद्यमान जिल्हाधिकार्‍यांनी दोन महिन्यांत ती पूर्ण केली; तसेच जागेपोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रुपयांपैकी ४७ कोटी रुपये संबंधित जमीनमालकांच्या बँक खात्यात जमा झालेेले आहेत. दहा लाखांपासून एक कोटी रुपयांची रक्कम जागेपोटी तेथील लोकांना मंजूर झालेली आहे. भूसंपादनामुळे विमानतळाचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

error: Content is protected !!
Exit mobile version