निकोबारमध्ये ४.३ तीव्रतेच्या भूकंपचे हादरे

निकोबार द्वीप समूहामध्ये आज मंगळवारी सकाळी सहा वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रेक्टर स्केल एवढी नमूद करण्यात आली. या भूकंपामुळे कोणतीही जीवित हनी न झाल्याचे समजले आहे तसेच कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. या आधी देशात राजस्थान मध्ये 13 ऑक्टोबर रोजी बिकानेर आणि त्याच्या आसपासचा भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या कारणामुळे लोक भयभीत होऊन घराच्या बाहेर पडले होते. या भूकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवर ४.५ इतकी नोंदवली गेली होती. हा भूकंप दहा वाजून ३६ मिनिटांनी आला होता व व त्याचे केंद्र जमिनीपासून दहा किलोमीटर आत होते. त्याही आधी दक्षिण फिलिपिन्स मधील मिंडानाओ द्वीप वर आलेल्या ६.४ रिक्टर स्केल् क्या भूकंपामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला होता व ६० हून अधिक लोक जखमी झाले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा