गोल पोस्ट गुन्हा निलेश राणे केज कोर्टात हजर; प्रकाश आंबेडकरांवर केली होती आक्षेपार्ह पोस्ट

निलेश राणे केज कोर्टात हजर; प्रकाश आंबेडकरांवर केली होती आक्षेपार्ह पोस्ट

बीड,(केज) २९ मार्च २०२३: माजी खासदार निलेश राणे आज बीडच्या केज न्यायालयात हजर झाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी २०२० मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०२० मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे यांच्यासह केज तालुक्यातील विवेक अंबाड, रा. लाडेगाव व रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरुन दोन समाजामध्ये व्देषभाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. याप्रकरणी केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती.

यानुसार निलेश राणे, विवेक अंबाड आणि रोहन चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी तपास करुन दोषारोप न्यायालयात पाठविले होते. त्यानंतर आज निलेश राणे हे न्यायाधीश पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version