न्यूमोनियामुळे दर ३९ सेकंदाला एका बालकाचा मृत्यू

आजही भारतात न्यूमोनिया सारख्या आजारवर प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे भारतात २०१८ मध्ये ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या १ लाख २७ हजार बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे यात न्यूमोनियाने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. दर ३९ सेकंदाला एक बालक न्यूमोनियामुळे जीव गमावत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात ही बाबसमोर आली आहे.

संयुक्त राष्ट्र बालकोश (युनिसेफ) चा अहवाल
जगात २०१८ वर्षामध्ये न्यूमोनियामुळे ५ वर्षांखालील ८ लाख बालकांचा मृत्यू झाला आहे. मृत बालकांपैकी सर्वाधिक बालक २ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. १ लाख ५३ हजार बालक जन्माच्या पहिल्याच महिन्यात मृत पावले. नायजेरियामध्ये न्यूमोनियामुळे बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे.

न्यूमोनिया होण्याची कारणे

शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता, आरोग्यविषयी दुर्लक्ष, पोषण आहाराची कमी तसेच वायुप्रदूषण ही न्यूमोनिया होण्याची प्रमुख कारणे आहेत.

न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू होणारे एक प्रमुख कारण म्हणजे वायुप्रदूषण आहे. ५ वर्षे वयात होणाऱ्या एकूण मृत्यूमध्ये १५ टक्के मृत्यू हे न्यूमोनिया या आजारामुळे होतात.
त्यामुळे निमोनिया आजारावर प्रभावी औषध निघणे गरजेचे आहे.वाढते मृत्यूचे प्रमाण बघता हे धक्कादायक आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा