राशिन येथे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या नऊ जनावरांना टेम्पो सह घेतले ताब्यात

राशिन, दि. ६ जून २०२०: राशिन येथे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या नऊ जनावरांना टेम्पो सहीत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे राशिन येथे काही जनावरांना घेऊन टेम्पो येत असल्याची माहिती राशिन पोलिसांनी मिळाली.

पोलिसांनी समजलेल्या ठिकाणी परिसरात दबाधरून पाळत ठेवली. काही वेळाने राशिन येथील आंबेडकर चौकात एक आईसर गाडी आल्यावर पोलिसांनी त्यास आडवले असता. कत्तलसाठी गो वाहतूक होत असल्याचे आढळले. तो टेम्पो पोलिसांनी पकडला असून त्या मध्ये नऊ जनावरे ताब्यात घेतले आहेत.

आरोपी सदर टेम्पो चालक मनोज साळवे राहाणार राशिन यास ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस नाईक मारूती काळे, अंकुश ठोंबरे यांनी केली असुन पकडलेले सर्व जनावरांना गो शाळेत मध्ये ठेवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष